Wednesday 20 June 2012

आमचा…….? महाराष्ट्र !!! आणि आमची मराठी …..

पर राज्यातील कावळा
महाराष्ट्रातील झाडावर आला
काव काव करत विनंती करू लागला
या झाड़ा वरील कावळ्यानी दिला त्याला
…..आसरा………..
आणि आपल्याच ताटातला दिला त्याला चारा
चारा खाऊन तो कावळा धष्ट पुष्ट झाला
वर्षा नंतर गावाकडे जाण्याचा विचार केला
गावाकडे जाउन युक्ती त्यांन केली
जाताना सोबत घेउन जावी फॅमिली
बायका पोरा सकट तो पुन्हा रवाना झाला
आनंदाने भाड्याच्या घरट्यात राहू लागला
बायका पोर कामा मधे साथ त्याला द्यायचे
थोड्या पगारात खुप कष्ट करायचे
अस करता करता कामाचा बोझा
खुपच वाढला …..
मग काय…. मेहुना, मेहुनी, सासु
सासरे, सगळ्या राज्याचा
संसार…. याच झाडावर रंगला
आता त्या कावळ्याला भाड्याच घर नको होत
आपल स्वत हाच असाव अस सारख वाटत होत
मग काय त्यान …हुशारी केली
महाराष्ट्रतल्या कावळ्याना
थोड़ी लाच दिली
अलिबाग, बदलापुर , कर्जत , कसारा
सुन्दर अशी हवा
थोड़े फार पैसे घेउन तितेच रहावा
ताजी , ताज़ी फळे रोज रोज खावा
बिचारे कावले मस्त पैकी हसले
आणि त्या लबाडाच्या….बोलण्याला लगेच फसले
…हळु हळु बिचारे खुप खुप थकले
बिचारे भुकेने भलतेच मेले
आपल्याच राज्यात आपले हे हाल झाले ………!!

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.