Saturday 16 June 2012

'मराठी रियासत'

स्वतंत्रपणे मराठी स्वराज्याची स्थापना करणारे 'राजे शिवाजी' हे मराठी माणसाचं मर्मस्थळ आहे, मानबिंदू आहे.
चारही पुरुषार्थ गाजवून जीवन कृतार्थपणे जगलेल्या महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आयुष्याच्या संध्याकाळी एका प्रचंड आवर्ताला तोंड द्यावे लागले.
राजा आणि त्याच्यातला माणूस, दोन्ही संकटात सापडले. पण समूळ नष्ट होण्याचं आव्हान विलक्षण ताकतीनं पेललं ते शिवाजीतल्या माणसानं!
अंतर्बाह्य भारतीय संस्कृती जगवणार्‍या या माणसानं अवघ्या मानव जातीला जगण्याची प्रेरणा देता देता स्वत:च्या आयुष्याची आहुती कशी दिली याची कथा म्हणजे 'राजेश्री'.
ना. सं. इनामदारांच्या इतिहासप्रेमी प्रतिभेतून निर्माण झालेला हा नवा आविष्कार मराठी माणसांची मनं हेलावून टाकतो यात शंकाच नाही.

 अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ.
मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसरा बाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासतमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशे-अडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले.
खंड १ - शहाजीराजे भोसले, शककर्ता शिवाजी
खंड २ - उग्रप्रकृती संभाजी, स्थिरबुद्धी राजाराम
खंड ३ - पुण्यश्लोक शाहू, पेशवा बाळाजी विश्वनाथ, पेशवा बाजीराव
खंड ४ - पेशवा बाळाजीराव
खंड ५ - निग्राहक माधवराव, अपेशी नारायणराव, दुराग्रही रघुनाथराव
खंड ६ - छत्रपती रामराजा, छत्रपती धाकटे शाहूराजे, पेशवा सवाई माधवराव
खंड ७ - छत्रपती धाकटे शाहूराजे, पेशवा सवाई माधवराव
खंड ८ - पेशवा दुसरा बाजीराव
संपादक : रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.